लिव्ह-इन पार्टनरचे लैंगीक शोषण करणाऱ्या विवाहीत प्रियकराला अटक, 20 लाख रूपये-सोनं लुटल्याचा आरोप

बंगळुरुच्या बागलकुंटे येथे लिव्ह-इन रिलेशनशिपच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने 20 लाख रुपये आणि जवळपास 200 ग्रॅम सोने लुटल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय प्रियकराला फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुलार, शुभम शुक्ला असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, नंतर तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी तिचा वापर केला. नंतर त्याने तिच्या मोठ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आणले. आरोपीने पीडितेला ती मुंबईत कामासाठी जात असल्याचे तिच्या पालकांना खोटे बोलण्यास भाग पाडले. पण मुंबईत न जाता तीन वर्षे बंगळुरूमध्ये त्याच्यासोबत लीव्ह इन मध्ये राहिली. त्या दरम्यान त्याने तिचे पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडितेला नंतर कळले की शुभम शुक्ला आधीच विवाहित होता. हे जेव्हा महिलेला कळले तेव्हा त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने तसे केले नाही. तो तिचा छळ करत राहिला. अखेर छळ सहन न झाल्याने, महिलेने पळून जात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.