सलग तिसऱ्या दिवशी ‘बेस्ट’ प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मातेश्वरी’ कंपनीच्या गाडय़ांना वारंवार आग लागत असल्यामुळे ‘बेस्ट’ने संबंधित पंपनीच्या 412 बसेसची सेवा तातडीने थांबवल्यामुळे 36 मार्गांवर शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

बंद केलेल्या बसच्या संबंधित मार्गांवर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ‘बेस्ट’कडून 297 बस सोडल्याचे सांगण्यात आले. मात्र या बस सोडताना इतर मार्गावर कमी करून या मार्गांवर आणल्या गेल्या. त्यामुळे संपूर्ण मुंबईभरात ‘बेस्ट’ बस सेवेवर याचा परिणाम झाला. दादर प्लाझा येथील बस स्टॉपवर रात्री कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.