गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करून प्रियकराने घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

उत्तर प्रदेशमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. व्हिडीओ कॉलदरम्य दोघांमध्ये भांडणे झाली, त्यानंतर प्रियकराने हे टोकाचे पाऊल उचलले.

विपुल कुमार सिंह हा तरुण अमरोहा जिल्ह्यात एक सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे कामावरून येऊन त्याने आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत होता. कॉलदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. दोघांचे बोलणे झाल्यावर विपुलने पंख्याला लटकून आत्महत्या केली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी विपुलकडील आधार कार्डवरून त्याची ओळख पटवली. त्याचे फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर ही माहिती समोर आली. पुढील तपासासाठी विपुलच्या प्रेयसीशीही चौकशी करण्याची शक्यता आहे.