बाभळगाव येथील कनिष्ठ लिपिकाला 3 हजाराच्या लाचेसह अटक

bribe

लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील लिपिक प्रमोद सितापे यास 3 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत मंजूर लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कनिष्ठ लिपिक प्रमोद सीतापे यांनी चार हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर तीन हजार रुपये घेण्याचे ठरले.

दरम्यान तक्रारदार यांनी थेट नांदेड येथे याची तक्रार दाखल केली आणि नांदेड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक प्रमोद सीतापे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या