भादोलकर महाराजांचे निधन, आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बुलडाणा

भादोलकर  महाराजांचं गुरुवारी दुपारी इंदूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. भादोलकर महाराज यांचे पूर्ण नाव दिगंबर श्रीकृष्ण जोशी असे होते.  बुलढाणा जिल्ह्यातील भादोला येथे त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची गोडी लागली होती. राधा कृष्णाची उपासना करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भागवत कथेच्या माध्यमातून शिष्यवर्गाला जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला.  बापूसाहेब चातुर्मास्ये यांना त्यांनी आपले गुरु मानले होते.

भादोलकर महाराजांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्यावर इंदूर इथे उपचार सुरू होते. वय जास्त असल्याने त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर त्यांचे ऋषीपंचमीच्या दिवशी निधन झाले. भादोलकर महाराजांचे पार्थिव वाशीमला आणण्यात आले असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  दुपारी चार वाजता त्यांचेवर वाशिम येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.