
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यावर समाज माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांची कारकीर्द अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली होती. त्यावर नेटकऱ्यांनी बोट ठेवले.
‘महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे गट आणि भाजपचे असंवैधानिक सरकार बसवल्याबद्दल हा मोदी सरकारने दिलेला किताब आहे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त झाली. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचाही अपमान केला होता. त्याकडे लक्ष वेधत ‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱयांचा भाजप सन्मान करतो’, असा संताप अनेक युजर्सनी व्यक्त केला. एका युजरने ‘भाज्यपाल’ असा उल्लेख करत देशासाठी यांचे योगदान काय, असा सवालही केला आहे.
























































