>> सूरज बागड, भंडारा
भंडारा जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. राज्य सरकारने एक पत्रक काढलं होत की ज्या जिल्ह्यात आदिवासीची संख्या अधिक आहे अशा जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी. पण भंडारा येथील जिल्हाधिकारी योगेश कुंभेंजकर यांनी जिल्ह्यात आदिवासी लोकांची संख्या जास्त नसल्याचं सरकारला सांगितलं.
म्हणून आज आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संघटेने जिल्हाधिकारी यांचा निषेध केला आहे. जिल्ह्यात आदिवासी समाज नसेल तर मग आदिवासी प्रकल्प कार्यालय काय करते हा प्रश्न देखील उपस्थित केला गेला आहे. आदिवासी नेते विनोद वट्टी यांच्या नेतृत्त्वात हा निषेध करण्यात आला. तर जिल्हाधिकारी यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन करू अशा इशारा आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला.