भंडाऱ्यात एक कंत्राटदार निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवत होता. काही ग्रामस्थांनी या कंत्राटदाराला विरोध केला म्हणून मुजोर कंत्राटदाराने या गावकऱ्यावर काँक्रीट ओतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत टाकला गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन गावात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामात कंत्राटदार सिमेंट कमी घालतं असल्यानं गावातील दुर्गादास तांडेकर यांनी कांत्रादर यांना जाब विचारला. तांडेकर यांनी कंत्राटदाराला आणखीन सिमेंट घालायला सांगितले. पण कंत्राटदारने मुजोरी दाखवली. या कंत्राटदारा दुर्गादास यांच्या अंगावरच काँक्रिट ओतलं व जिवे मारण्याची धमकी दिली. हा गंभीर प्रकार असून आता या कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.