
सामना प्रतिनिधी । मुंबई
भांडुप परिसरात शाळा, कॉलेज, पान टपऱयांबाहेर उभ राहून विद्यार्थी तसेच तरुणांना गांजाची विक्री करणाऱया आठ ड्रग्ज पेडलर्सना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने दणका दिला. पोलिसांनी नऊजणांना पकडून दीड लाख किमतीचा ९ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे.
ड्रग्ज तस्कर आणि पेडलर्सनी भांडुप व आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. नशेबाज आणि त्यांना ड्रग्ज पुरवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढू लावल्याने गुन्हेगारीला खतपाणी मिळत होते. यामुळे भांडुपमधील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शेळके, एपीआय शिवडीकर आदींच्या पथकाने ड्रग्ज पेडलर्सचा शोध सुरू केला होता. त्यानुसार पोलीस पथकाने भांडुप परिसरावर करती नजर ठेवून आठ पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे छोटय़ा छोटय़ा पुडय़ांमध्ये ९ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.
























































