‘भारत डायनामिक्स’मध्ये सुनील मोने यांची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत डायनामिक्स कंपनीने अशासकीय स्वतंत्र संचालक म्हणून संचालकांची नियुक्ती केली आहे. यात मुंबईच्या सुनील चिंतामण मोने यांचा समावेश आहे. याशिवाय प्रोफेसर डॉ. सन्मित्रा मिश्रा, राजेंद्र सिंग शेखावत, नंदा कुमार सुब्रमण्यम आणि डॉ. पवन स्थापक यांचीही नियुक्ती केली आहे. सुनील मोने हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. सध्या ते एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कर्मचारी सल्लागार म्हणून विविध प्रकल्पांमध्ये वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भारत डायनामिक्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून येथे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र बनवली जातात.