
>> सुचित्रा दिवाकर
जगातील सर्वात उंच असलेल्या 14 शिखरांपैकी नऊ शिखरे पादांत करण्याचा पराम आंध्र प्रदेशचे 36 वर्षीय गिर्यारोहक भरत थम्मिनेनी यांनी केला आहे. त्यांचे साहस नव्या पिढीतील तरुणांना प्रेरणादायी ठरणारे आहे.
जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याचे ध्येय गिर्यारोहकांना असतेच. शारीरिक क्षमता, ध्येय, चिकाटी, आपत्कालीन स्थितीत सामना करण्याची क्षमता अशा कितीतरी गोष्टींना पाठीशी घेऊन गिर्यारोहक चढाई करत असतात. प्रामुख्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न गिर्यारोहक बाळगून असतात. मात्र आता त्याही पुढे जात गेल्या दहा वर्षांत जगातील सर्वात उंच असलेल्या 14 शिखरांपैकी नऊ शिखरे पादांत करण्याचा पराम आंध्र प्रदेशचे 36 वर्षीय गिर्यारोहक भरत थम्मिनेनी यांनी केला आहे. चीन-नेपाळ सीमेवरचे माऊंट चो ओयू शिखर त्यांनी नुकतेच सर केले. त्यांचे साहस नव्या पिढीतील तरुणांना प्रेरणादायी ठरेल, अशी आशा त्यांनी बाळगली आहे.
आंध्र प्रदेशातील कर्नुलचे गिर्यारोहक भरत थम्मिनेनी यांनी नुकतेच चीन अणि नेपाळ सीमेवरचे जगातील सहाव्या ाढमाकांचे सर्वात उंच शिखर माऊंट चो ओयू (8188 मीटर) सर करत जगातील सर्वात उंच असणाऱया 14 शिखरांपैकी नऊ शिखरे पादांत करण्याचा पराम केला आणि असा पराम करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
36 वर्षीय थम्मिनेनी यांनी चीनमधील शिखर सर करण्यापूर्वी मे 2017 रोजी माऊंट एव्हरेस्ट (8848 मीटर), सप्टेंबर 2018 मध्ये माऊंट मानसलू (8163 मीटर), मे 2019 मध्ये माऊंट ल्होत्से (8516 मीटर), मार्च 2022 मध्ये माऊंट अन्नपूर्णा (8091 मीटर), एप्रिल 2022 मध्ये माऊंट कांचनजंगा (8586 मीटर), मे 2023 मध्ये माऊंट मकालू (8485 मीटर), ऑक्टोबर 2024 मध्ये माऊंट शीशपांगमा (8027 मीटर) आणि एप्रिल 2025 मध्ये माऊंट धौलगिरी (8167 मीटर) ही शिखरे सर केली. उर्वरित पाच आघाडीच्या शिखरांमध्ये माऊंट केटू, नंगा पर्वत, गशेरब्रुम एक आणि दोन व ब्राड पीक हे पाकिस्तानात आहे आणि सध्याच्या काळात तेथे भारतीय गिर्यारोहकांना जाण्यास मनाई आहे.
थम्मिनेनी हे 30 सप्टेंबर रोजी चीनच्या चो ओयू बेस कॅम्पवर पोहोचले. मात्र खराब हवामान आणि प्रचंड हिमवृष्टी सुरू असल्याने प्रारंभी शिखर सर करण्याची मोहीम थांबवावी लागली. त्यामुळे काही दिवस शिबिरात थांबले. नंतर 12 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी वातावरण निवळण्याची वाट पाहिली आणि लवकरात लवकर शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. यानुसार वातावरणाने आणि त्यांच्या ध्येयाने साथ दिली व गिर्यारोहक थम्मिनेनी हे मंगळवारी सकाळी भारतीय वेळेनुसार 8.55 वाजता चो ओयू शिखरावर पोहोचले. तेथे तिरंगा ध्वज फडकाविला तेव्हा तमाम भारतीयांची मान उंचावली गेली. थम्मिनेनी यांनी कमी वेळात कठीण शिखर सर करण्याचा पराम केलाच त्याच वेळी त्यांच्यासोबत मार्गदर्शन करणारा एकही शेर्पा नव्हता, हे विशेष! गिर्यारोहण कंपनी बूटस अँड ा@ढम्पन्सचे ते संस्थापक असून थम्मिनेनी यांना भारतातील सर्वात कुशल गिर्यारोहकाचा दर्जा प्राप्त आहे. थम्मिनेनी यांचे मित्र दीपांजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत भरत थम्मिनेनी यांनी सहा खंडातील अभियानाला मार्गदर्शन केले असून भारतातील नव्या पिढीतील गिर्यारोहकांना ते सतत प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट 2025 अभियानाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. हिमाचल प्रदेशच्या रहिवासी छोजिन आग्मो या जगातील सर्वात उंचीचे शिखर सर करणाऱया पहिल्या दृष्टिहीन महिला ठरल्या, तर त्याच वेळी 16 वर्षीय विश्वनाथ कार्तिकेय हा जगातील सात शिखरे सर करण्याचे आव्हान पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय गिर्यारोहक ठरला.
भरत थम्मिनेनी यांनी आपले यश साहसी खेळात सहभाग घेणाऱया नव्या पिढीतील भारतीय खेळाडूंना समर्पित केले. शिखर सर करणे हे व्यक्तिगत यश नसून भारतीयांच्या धाडसी खेळात असलेल्या क्षमतेचे ते प्रतीक आहे, असे ते म्हणतात. शिखरांना सन्मान, धैर्य आणि निश्चियीपणा हवा असतो. चो ओयू शिखरावर चढाई करण्याचे यश हे भारतीय गिर्यारोहकाच्या नव्या पिढीला शिखरावर जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा करतो, अशी भावना भरत यांनी व्यक्त केली.






















































