भारती कॅम्प परिसरात अर्भक आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पूर्णा

पूर्णा ते झिरो फाटा-परभणी रोडवर भारती कॅम्प परिसरात आज बुधवार, १७ रोजी ३ वाजता एका निर्दयी मातेने दोन दिवसाच्या अर्भकाला सोडून पलायन केल्याची घटना घडली. पंचायत समिती सदस्यांच्या सतर्कतेमुळे या दोन दिवसीय स्त्री जातीचे अर्भक आढळले.

झिरोफाटा ते परभणी भारती कॅम्प परिसरात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास कॅनलजवळ एका छोट्या दोन दिवस नवजात अर्भकाचा रडण्याचा आवाज फिरस्ती व्यक्ती गंगाधर हनुमंत नकलवाढ यास आला. त्याने या घटनेची खबर तात्काळ एरंडेश्वर येथील पंचायत समिती सदस्य माणिकराव काळे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ते अर्भक पूर्णा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान या २ दिवसीय नवजात मुलीस रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्या अर्भकला परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आले. दरम्यान शासकीय रूग्णालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी धाव घेऊन त्या मुलीची पाहणी केली.