
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने उभ्या केलेल्या लढय़ामुळे भूमिपुत्रांना केवळ रोजगारच मिळाला असे नव्हे, तर सन्मानही मिळाला. मराठी माणसाला सरकारी आस्थापना, बँका आणि हॉटेलांमध्ये नोकरीच्या रूपाने मानाचे पान मिळाले. स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेनेने या लढय़ात मोठे योगदान दिले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. हॉटेल ग्रँड हयातमधील कर्मचाऱ्यांनीही शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांच्या पुढाकाराने हॉटेल ग्रँड हयातमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सुभाष देसाई, ऍड. अनिल परब, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील राऊत, आमदार मनोज जामसुतकर, उपनेते सचिन अहिर, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम, डॉमनिक डीसा, किशोरी पेडणेकर, भाऊ कोरगावकर, महादेव देवळे, अमोल कीर्तिकर, सदा परब, राजू भूतकर, राजा ठाणगे, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, हिंदुजा हॉस्पिटल युनिट, हयात रिजन्सी मुंबई युनिट, लीला हॉटेल युनिटच्या पदाधिकायांसह अभिषेक सावंत, प्रदीप कदम, उद्योजक मंगेश वाळंज, हरी शास्त्राr, ज्येष्ठ कायदेतज्ञ मृणालिनी देशमुख, जय सरपोतदार, मिलिंद गुणाजी, पूजा महाडेश्वर, हॉटेल व्यवस्थापनाकडून जनरल मॅनेजर रॉबर्ट डालीमीर, एचआर नीता दासन, अक्षय परब, उल्हास पांचाळ उपस्थित होते. आयोजक मनोज धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपूर्वा प्रभू, पूजा सुर्वे, अंजली जाधव, रसिका सावंत, दीपिका साटम, अमिता आव्हाड, अंजली जाधव यांनी विशेष सहकार्य केले.





























































