भीम आर्मीच्या मेळाव्याला सशर्त परवानगी

441

भीम आर्मीच्या मेळाव्याला उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. न्यायालयाने काही अटी -शर्तीच्या आधारावर ही परवानगी दिली असून त्याचे पालन आयोजकांना करावे लागणार आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी व न्यायालय अवमानतेची कारवाई केली जाणार आहे.

रेशीमबाग मैदानाजवळ रा. स्व. संघाचे मुख्यालय आहे. भीम आर्मी आणि रा. स्व. संघ यांच्या विचारधारा भिन्न आहेत. येथे मेळावा झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे 17 फेब्रुवारीला कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या आदेशाविरुद्ध भीम आर्मीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मेळाव्याला सशर्त परवानगी दिली आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. जे. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या