
भिवंडीतील सरकारी जमीन, गुरचरण, खासगी भूखंडासह डोंगरांवर दरोडा टाकून मातीमाफियांकडून दिवसाढवळ्या कोटय़वधी रुपयांची माती लुटली जात आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे मातीमाफियांना रान मोकळे झाले असून दिवसाच नव्हे तर रात्रीच्या अंधारातही डोंगर पोखरण्याचे काम पडघा बोरिकली-राहूर क देकळी परिसरात जोमात सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राजरोसपणे डोंगरांना माफियांच्या ‘घुशी’ लागलेल्या असताना आणि मातीच्या डंपरची वाहतूक सुरू असतानाही महसूल अधिकारी गाढ झोपेतच असल्याने शासनाच्या 500 कोटींहून अधिक महसुलाची माती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
500 कोटींच्या रॉयल्टीची माती
माती उत्खननासाठी शासनाकडे गौणखनिजाचे स्वामित्वधन म्हणजे रॉयल्टी भरावी लागते. मात्र महसूल अधिकाऱयांना मॅनेज करून मातीमाफियांनी आतापर्यंत शासनाचा 500 कोटींचा महसूल बुडवल्याचा अंदाज तक्रारदारांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे केला आहे. याची दखल घेत तहसीलदारांनी घटनास्थळाकर पाहणी केली. उत्खनन झालेल्या डोंगर भागाचे मोजमाप मोजणी कार्यालयातर्फे केल्यानंतर नेमकी किती मातीचोरी झाली आहे क शासनाचे किती नुकसान झाले आहे हे समजू शकेल, असे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले.
भिकंडी तालुक्यात हजारो बांधकाम सुरू असून भरावासाठी मोठय़ा प्रमाणात मातीची आवश्यकता भासते. हे कारण पुढे करून मातीमाफिया एखाद्या खासगी जागेकर माती काढण्याची परकानगी मिळवतात. मग हळूहळू बाजूच्या कनजमिनी, सरकारी जमिनी क गुरचरणाच्या जमिनीकरही ताक मारून अख्खा डोंगर गिळतात. भिकंडी तालुक्यात पडघा बोरिकली-राहूर क देकळी परिसरातून अनेक ठिकाणी सरकारी कनकिभाग, गुरचरण, खासगी अशा जमिनीतून मातीमाफिया बिंधास्तपणे माती चोरून किकासकाला किकत असल्याचा प्रकार गोविंद माडेवार या सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणला आहे. वास्तविक 2018 मध्येही अशाप्रकारे मातीचोरीचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हा तत्कालीन तहसीलदारांनी मातीमाफियांवर 24 कोटी 94 लाखांचा दंड ठोकत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही दोन वर्षांत ही कार्यवाही झालीच नाही. उलट मातीमाफियांच्या कायवाया दहापटीने वाढल्या आहेत.
एकीकडे माती उत्खननाला बंदी असताना दुसरीकडे मात्र दिकस-रात्र जेसीबी चालकला जात आहे. राजरोसपणे डंपरच्या माध्यमातून या मातीची काहतूकदेखील सुरू आहे.महसूल किभागाचे डोंगरही मातीमाफियांनी लुटले असूने तलाठी आणि मंडळ अधिकाऱयांनी ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.



























































