‘भौरी’ चे स्पेशल स्क्रीनिंग

जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एनजीओसाठी ‘भौरी’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. फन रिपब्लिक सिनेपोलिस अंधेरी येथे ‘भौरी’ प्रदर्शित करण्यात आला.

एड्सची शोकांतिका मांडणारा ‘भौरी’ चित्रपट 2016 साली आला होता. त्यामध्ये महिलांच्या समस्या बारकाईने मांडण्यात आल्या आहेत. अनेक चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता स्क्रिवायर एंटरटेनमेंट अँड कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने चित्रपट पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर थिएटरमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘भौरी’ची निर्मिती चंद्रपाल सिंग यांनी केली असून दिग्दर्शन जसबीर भाटी यांनी केले आहे. चित्रपटात रघुवीर यादव, माशा पौर, आदित्य पांचोली, कुनिका, शक्ती कपूर, मोहन जोशी, मुकेश तिवारी, मनोज जोशी, सीताराम पंचम आदींनी काम केले आहे.