
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणि सवा तासाचा प्रवास अवव्या 25 मिनिटांत करणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम शिवसेनेच्या प्रयत्नाने मार्च 2022 मध्ये सुरू झाले असताना याच मार्गाचे भूमिपूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, 13 जुलै रोजी होणार आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबतचे फोटोच ‘एक्स’वर जाहीर करीत सरकारच्या श्रेय लाटण्याच्या भूमिकेची पोलखोल केली आहे. दरम्यान, गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून भव्य सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालिकेच्या माध्यमातून 12.20 किमी लांबीचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बांधण्यात येत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणि संपूर्ण मुंबईची वाहतूककाsंडी पह्डण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱया या मार्गाची संकल्पना शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम मांडण्यात आली. प्रवासाची वेळ आणि इंधनाची बचत करण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱया या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मार्च 2022 मध्ये करण्यात आले. यानंतर हा रस्ता आणि मार्गातील उड्डाणपुलांचे कामही सुरू झाले. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. असे असताना आता याच मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने भूमिपूजन करण्याचा घाट मिंधे सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून घालण्यात आला आहे.
असा आहे प्रकल्प
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 12.20 किलोमीटर आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे, तर दुसऱया टप्प्यात 30 मीटर रुंद रस्त्याचे 45.70 मीटरपर्यंत रुंदीकरण, तिसरा टप्पा (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम आणि टप्पा 3 (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे 1.22 किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (3 बाय 3) असलेला पेटी बोगदा (कट अॅण्ड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा तयार करण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाक्यापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही.
असा होणार प्रकल्पाचा फायदा
या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे वाहतूककाsंडीपासून दिलासा मिळणार. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार. नाशिक महामार्गावर जाणाऱया वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल.
कंत्राटदार मित्रासाठी नव्याने टेंडर
मुंबईची वाहतूककाsंडी कमी करणारा आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम शिवसेनेच्या सत्ताकाळात सुरू झाले असताना या प्रकल्पाचे नव्याने भूमिपूजन करण्याची गरजच काय? बोगद्याच्या कामाचे कंत्राट नव्याने पिंमत वाढवून काढण्याची सरकारला गरज काय? आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठीच हा प्रयत्न केल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
बोगदा कामाच्या नावाखाली कार्यक्रम
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.20 किमीचा आहे. या प्रकल्पाच्या तिसऱया टप्प्यात नॅशनल पार्कखालून 4.7 किमी अंतराचा जुळा बोगदा तयार करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवार, 13 जुलै रोजी होणार आहे. सायंकाळी 5 वाजता गोरेगाव नेस्को सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.