रुग्ण बिग बॉस बघत असताना डॉक्टरांनी केली ओपन ब्रेन सर्जरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱ्याच्या घरात काय चाललय हे बघण्यातच अनेकांना भारी इंटरेस्ट… मग ते टीव्ही चॅनेलवर सुरू असलेले बिग बॉस का असेना. असाच एक बिग बॉसचा चाहता ऑपरेशन थिएटरमध्ये येतो आणि ऑपरेशन थिएटरचे खऱ्या अर्थाने थिएटर करतो. टीव्ही स्क्रीनवर बिग बॉस सुरू होते आणि डॉक्टर त्या रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करून मोकळे होतात आणि तेही यशस्वीपणे. या संवेदनशील भागावर सर्जरी करताना त्या रुग्णाचे शस्त्रक्रियेवरून लक्ष हटविण्यासाठी डॉक्टरांनीच ही बिग बॉसची नामी शक्कल लढविली.

आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील वृंदा न्यूरो सेंटरमध्ये वारा प्रसाद (33) यांच्यावर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली. ही अवघड शस्त्रक्रिया करताना रुग्णाला शुद्धीत ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी डॉक्टरांनी त्याचे आवडते बिग बॉस स्क्रिनवर सुरू केले आणि ट्यूमर हटविण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू केली. बिग बॉस संपल्यानंतर त्याला अवतार चित्रपटही दाखविण्यात आला. रुग्ण बिग बॉस व चित्रपट बघण्यात गुंतला असतानाच डॉक्टर त्याच्यावर सर्जरी करून मोकळे झाले.

हैद्राबाद येथे 2016  मध्ये वारा प्रसादवर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली होती पण ती अयशस्वी झाल्याने पुन्हा ही शस्त्रक्रिया गुंटूरमध्ये करण्यात आली. गुंटूरमधील डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. शेषाद्री शेखर, डॉ. त्रिनाथ यांनी नवीन तंत्रज्ञान आणि मशीनचा वापर करून ही किचकट सर्जरी सोपी केली.