
राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आजच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे तसेच मृत्यूच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 740 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे, तर आज एकूण 13 हजार 027 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तसेच आज दिवसभरात फक्त 51 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या 51 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 61 हजार 720 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के एवढे झाले आहे.



























































