
बिग बॉस फेम गायक अब्दू रोझिक याला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अठक करण्यात आली आहे. अब्दू मोंटेनेग्रो वरून दुबई विमानतळावर उतरताच त्यालसा अटक करण्यात आली आहे. चोरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री अब्दूला अटक करण्यात आली आहे.
अब्दू रोझिक हा 21 वर्षांचा आहे. मात्र त्याची उंची ही एका पाच वर्षांच्या मुला इतकीच आहे. सेलिब्रिटी गायक असलेला अब्दू हा बिग बॉस हिंदीच्या 16 व्या सिझनसाठी हिंदुस्थानात आला होता. त्यानंतर तो हिंदुस्थानच्या घराघरात पोहोचला. अब्दू हा मूळचा दुबईचा असून तिथे तो अलिशान घरात राहतो.