
अभिनेता गौरव खन्ना हा बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. गौरवने प्रणित मोरे व फरहाना भट यांना हरवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गौरव खन्नाने जिंकलेला हा दुसरा रिअॅलिटी शो आहे. याआधी त्याने सेलिब्रिटी शेफ हा शो जिंकला होता.
बिग बॉसच्या अंतिम सामन्यात गौरव मोरे, प्रणित मोरे, फरहाना भट, अमाल मलिक, तान्या मलिक हे फायनलमध्ये होते. पहिल्या राऊंडमध्ये प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिक बाहेर पडला. त्यानंतर तान्या मलिकला कमी व्होट्सच्या आधारावर बाहेर यावं लागलं.



























































