
सामना ऑनलाईन, श्रीनगर
जम्मू-काश्मीर पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी 1999 पासून लष्कराच्या मुख्यालयावर, लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले. तर अनेक भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमकीही उडाल्या होत्या.
- 3 नोव्हेंबर 1999 – लष्कराच्या बदामबाग मुख्यालयावर दहशतवादी हल्ला. मेजर पुरुषोत्तमसह 10 जवान शहीद
- 19 एप्रिल 2000 – कश्मीर खोऱ्यात पहिल्यांदा मानवी बॉम्बचा स्फोट; बदामबाग येथे 2 जवान शहीद.
- 10 ऑगस्ट 2000 – श्रीनगरात रेसिडेन्सी रोडवर ग्रेनाईड हल्ला; 11 नागरिकांचा मृत्यू.
- 1 ऑक्टोबर 2001 – श्रीनगरात विधानसभेच्या जुन्या इमारतीबाहेर कार बॉम्बस्फोट; 38 नागरिक ठार.
- 17 नोव्हेंबर 2001 – रामबन येथे सुरक्षा दलावर हल्ला; 10 जवान शहीद, 4 दहशतवाद्यांचा खात्मा.
- 14 मे 2002 – जम्मूत कालूचक कॅण्टोन्मेंट येथे हल्ला; 36 नागरिकांचा मृत्यू, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान.
- 28 जून 2003 – सुंजवान लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; 12 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
- 22 जुलै 2003 – अख्नुर लष्करी तळावर हल्ला; ब्रिगेडियरसह 8 जवान शहीद.
- 8 एप्रिल 2004 – उरी येथे पीडीपीच्या रॅलीवर हल्ला, 11 नागरिकांचा मृत्यू.
- 4 ऑगस्ट 2004 – श्रीनगरात राजबाग येथे दहशतवादी हल्ला; 9 जवान शहीद. एका दहशतवाद्याचा खात्मा.
- 24 जून 2005 – श्रीनगरात दहशतवाद्यांचा कार बॉम्बस्फोट; 9 जवान शहीद.
- 2 नोव्हेंबर 2005 – मुफ्ती महंमद सईद यांच्या निवासस्थानात सुसाइड बॉम्बर करून कार स्फोट; 3 पोलीस शहीद, 6 नागरिकांचा मृत्यू.
- 19 जुलै 2008 – श्रीनगर-बारामुल्ला रस्त्यावर आयईडी स्फोट; 10 जवान शहीद.
- 24 जून 2013 – श्रीनगरात लष्करावर हल्ला; 8 जवान शहीद.
- 5 डिसेंबर 2014 – उरी रेथील मोहारा येथे लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 10 जवान शहीद.
- 3 जून 2016 – पम्पोरा येथे सीआरपीएफवर हल्ला; 3 जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू. 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
- 18 सप्टेंबर 2016 – उरी येथील लष्करी मुख्यालयावर हल्ला; 19 जवान शहीद.
- 29 नोव्हेंबर 2016 – नगोटा येथे लष्कराच्या तळावर हल्ला; 7 जवान शहीद. चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान.
- 26 ऑगस्ट 2017 – पुलवामा येथे पोलीस लाइन येथे हल्ला; 8 जवान शहीद. ‘जैश’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा.
- 14 फेब्रुवारी 2019 – सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला; 40 जवान शहीद.
स्कॉर्पिओमध्ये होती 350 किलो स्फोटके
दहशतवादी क्रूरकर्मा आदिल अहमद दार याने हल्ल्यासाठी स्कॉर्पिओचा वापर केला. ही गाडी आदिल दार चालवत होता. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके होती. अवंतीपुरा येथे सीआरपीएफ जवानांचा ताफा आला तेव्हा भरधाव वेगाने सुसाइड बॉम्बर आदिल ताफ्याच्या विरुद्ध दिशेने आला आणि जवानांच्या बसवर जोरात आदळला. हा स्फोट एवढा भीषण होता की, बसचे तुकडे 200 मीटरपर्यंत जाऊन पडले. जवानांच्या चिंधडय़ा उडाल्या.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बोलावण्यात आल्याचे वृत्त एनआयएने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्कराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री पीयूष गोयल यांची उपस्थिती असेल. या बैठकीत पुढील कारकाईबाबतची क्यूहरचना आखण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.






















































