बिहारमध्ये मंत्री बनण्यासाठी 27 आमदारांकडून तांत्रिक पूजा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारणात मोठा ट्विस्ट आला. नितीश कुमार हे राज्यसभेवर गेल्यामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठी सध्या भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचेही समोर येत आहे. अद्याप बिहारमध्ये नवीन सरकार कधी बसेल ते ठरलेले नसले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रित पूजा होत असल्याचे बोलले जात आहे.

बिहारमधील जवळपास 27 आमदारांनी तांत्रिक पद्धतीच्या प्रकारच्या पूजा केल्याचे दैनिक भास्करने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दैनिक भास्कर ने तंत्र-मंत्र करणाऱ्या बाबांशी बातचीत केल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या चैत्र नवरात्रीत अनेकांनी मंत्री बनण्यासाठी पूजाविधी केल्या आहेत. कुणी घरातील दोष निवारण पूजा केल्या आहेत. तर कुणी मोठं पदं मिळवण्यासाठी तांत्रिकांकडून पूजा करून घेतल्याचे समजते. सध्याच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यासहित 12 मंत्र्यांनी अशा प्रकारच्या पूजा केल्याचे समजते.