
व्होटचोरीविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मताधिकार यात्रा काढली. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहतास येथील सभेत प्रश्न विचारला. मात्र, त्यावर आलेल्या उत्तराने शहांची फजिती झाली.
‘राहुल बाबा नुकतेच यात्रा करून गेले. त्यांच्या यात्रेचा विषय काय होता, हे जरा तुम्हीच सांगा,’ असे अमित शहा समोर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. त्यावर गर्दीतून ‘व्होट चोरी, व्होट चोरी’ असा आवाज घुमला. त्याने अमित शहा यांची भंबेरी उडाली. ‘अरे यार व्होट चोरी हा विषय नव्हता. मी नंतर सांगतो तुम्हाला विषय काय होता’, असे सांगत शहा कार्यकर्त्यांवर वैतागले.