बिहार सरकारचा 70 हजार कोटींचा घोटाळा; कॅगमधून उघड

बिहार सरकारने तब्बल 70 हजार कोटी रुपये कुठे खर्च केले, याचा हिशेबच नसल्याची धक्कादायक माहिती कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालातून उघड झाली आहे. खर्चाची आकडेवारी दर्शवणारे उपयोगिता प्रमाणपत्र बिहार सरकारला सादर करता आले नाही. बिहार सरकारचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. 

विरोधकांनी मतदार फेरतपासणीची पोस्टर्स फाडली

 संसद अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार मतदार फेरतपासणीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने केली. गांधी पुतळ्यापासून मकर दरवाजापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मकर द्वार येथे पोहताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका वॉड्रा यांच्यासह विरोधी खासदारांनी SIR लिहीलेली पोस्टर फाडून ती प्रतीकात्मक कचऱ्याच्या डब्यात फेकली.