
गरमागरम, वाफाळता आणि टवटवीत करणारा कटिंग चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. ‘चहाला केळ नसते पण केळेला चहा हवाच’ असे चहाप्रेमी अभिमानाने सांगतात. चहाची तलफ आली की वेळेची पर्वा न करता चहा पिणारे अनेकजण आहेत. सध्या एका चहाप्रेमीची जोरदार चर्चा रंगली आहे. चहा पिण्यासाठी गाडी किंवा बस थांबवल्याचे आपण पाहिले आहे. परंतु बिहारमधील सिवनमध्ये एका लोको पायलटने चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवल्याचा अजब प्रकार घडला आहे.
शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास सिवन येथे ही अजब घटना घडली आहे. ग्काल्हेर-बरौनी एक्सप्रेसच्या (11123) चालकाने सिवन येथील क्रॉसिंगवर चहा पिण्यासाठी काहीकेळ ट्रेन थांबवली. रेल्वे थांबताच गार्डने जवळच असलेल्या टपरीकरून चहा आणला आणि पुन्हा तो इंजिनमध्ये चढला. दोघांनी चहाचा आस्वाद घेतल्यानंतर ट्रेन पुन्हा मार्गस्थ झाली. दरम्यान, रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन थांबवल्यामुळे दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचा खोळंबा झाला. त्यात एका रुग्णवाहिकेचादेखील समावेश होता.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी गार्ड आणि लोको पायलट यांना शनिवारी कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे.
– रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि व्हायरल केला. उत्तर-पूर्व रेल्वेचे (एनईआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गार्ड आणि लोको पायलट यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

























































