दोन बायकांचा दादला भांडणाला कंटाळला, कापली एकीची जीभ

1166

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हयात भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. दोन बायकांच्या रोजरोजच्या भांडणाला कंटाळून पतीने दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने तिची जीभच कापली. पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शफीक असे त्याचे नाव आहे. तर मीना खातून (22) असे पीडितेचे नाव आहे.

सरैया गावात राहणाऱ्या मोहम्मदने पहीली पत्नी अंगूरी खातून हिच्या नकळत मीना या महिलेबरोबर निकाह केला होता. तसेच तो दोघींबरोबर एकाच घरात राहत होता. मीना आणि अंगूरी यांचे पटत नव्हते. त्या दोघींमध्ये रोज वाद व्हायचे. रोजच्या या वादाला मोहम्मद कंटाळला होता. काही दिवसांपूर्वी तो कामानिमित्त राजस्थानला गेला होता. गुरुवारी तो घरी परतला. तेव्हाही मीना आणि अंगुरी यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. मोहम्मदने दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दोघी भांडतच होत्या. त्यातच मीना भांडता भांडता घराबाहेर गेली व जोरजोरात ओरडू लागली. यामुळे मोहम्मद संतापला त्याने तिला घरात खेचत आणले व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने जवळच पडलेल्या ब्लेडने मीनाची जीभच कापली. दरम्यान, मीनाचा आरडाओरडा ऐकून शेजारी घराभोवती गोळा झाले होते. त्यातील एकाने आत जाऊन पाहीले असता मीना रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेली त्याला दिसली. त्यानंतर त्याने इतरांना बोलावले व मोहम्मदला एका खांबाला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी मीनाला रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी मीनाच्या आईने मोहम्मद व त्याची पहिली पत्नी अंगुरी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच मोहम्मद व अंगुरी वारंवार मीनाला जीभ कापण्याची धमकी द्यायचे असा आरोपही तिने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या