
सामना ऑनलाईन। मुंगेर
बिहारमधील मुंगेर जिल्हयात मंगळवारी एक ३ वर्षाची चिमुरडी बोअरवेल मध्ये पडली आहे. सना असे तिचे नाव असून तिला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सना घरासमोर खेळत असताना बोअरवेल पडली. बोअरवेल मध्ये सीसीटीव्ही सोडण्यात आले असून त्याद्वारे सनाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.
सना मंगळवारी आजीला भेटण्यासाठी आईबरोबर मुंगेर येथे आली होती. दुपारचे जेवण झाल्यावर ती घराबाहेर खेळत होती. बराचवेळ झाला तरी ती घरात न आल्याने तिची आई तिला शोधण्यासाठी बाहेर आली. पण तिला सना कुठेही दिसली नाही. दरम्यान, बाजूच्या घरात राहणाऱ्या मुलांनी ती बोअरवेलजवळ खेळत असल्याचे पाहीले होते असे सांगितले. त्यानंतर सनाच्या आईने बोअरवेलजवळ जाऊन सनाला हाक मारली. सनाने त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर तिच्या आईने व शेजाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी बचाव पथकाला पाचारण केले. तेव्हापासून सनाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोअरवेलमध्ये ऑक्सिजनही पुरवण्यात येत आहे. बोअरवेलच्या बाजूलाच मोठा खड्डा खोदण्यात येत असून ५० मजूर यासाठी काम करत आहेत. अशी माहिती एसडीआरएफचे निरिक्षक संजीत यांनी दिली आहे.
summary…bihar-munger-borewell-child-rescue-operation


























































