दहा वर्षीय मुलीवर बलात्कार, वेळेत उपचार न मिळाल्याने पीडितेचा मृत्यू

बिहारमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार झाला होता. त्यात वेळेत उपचार न मिळाल्याने या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने हलगर्जीपणा दाखवल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

बिहारमध्ये एका 10 वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची तब्येत बिघडली होती. कुटुंबीयांना मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. पण पुढच्या उपचारासाठी तिला पाटण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करायला सांगितलं. या मुलीला रुग्णवाहिकेत नेण्यात आलं. पण तब्बल पाच तास तिच्यावर काहीच उपचार झाले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतच तिचा अंत झाला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या मांडला. यावरून राज्य सरकावर चौफेर टीकाही झाली.