‘भाभीजी बहुत अच्छी है’, घर लुटल्यावर चोरट्यांनी लिहली नोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छट साजरी करण्यासाठी गावाला जाणे बिहारमधील एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण घरातील मंडळी गावात गेल्याचे हेरुन चोरट्यांनी घरातील 60 लाखाची रोकड, दागिने आणि घरातील महागड्या वस्तूंवर डल्ला मारला. एवढेच नाही तर घरात एवढे दागिने व रोकड ठेवल्याबद्दल घरातील स्त्रीचे कौतुकही केले. ‘भाभीजी बहुत अच्छी है’ असे या भामट्यांनी लिपस्टीकने आरशावर लिहले. पण घरातील कर्त्या पुरुषासाठी मात्र या चोरट्यांनी आरशावर अर्वाच्च शिव्या लिहल्या.

पाटणा येथील पत्रकार नगरमध्ये राहणाऱ्या या व्यापाऱ्याचे आई वडील गावी राहतात. यामुळे छट साजरी करण्यासाठी हे व्यापारी दाम्पत्य गावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी डाव साधला. घराला कुलुप असल्याचे बघून भामट्यांनी घराची कडी तोडली. आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून आतील 60 लाखाची रोकड आणि दागिने काढले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा घरातील महागड्या वस्तूंकडे वळवला. एवढेच नाही तर टुथपेस्टही भामट्यांनी लंपास केली. पण जाण्याआधी त्यांनी आरशावर लिपस्टीकने घरातील स्त्रीबद्दल लिहले. की ‘भाभीजी बहुत अच्छी है’ पण घरातील कर्तापुरुषासाठी मात्र त्यांनी शिव्या लिहल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापारी घरी आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली.