चहा प्रिय असणाऱ्या व्यक्ती असतात अधिक कल्पक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बिजींग

चहा पिणं हे आरोग्यास घातक असते असे सांगत डॉक्टर नेहमी रुग्णाला चहापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. पण चहा प्रिय असणाऱ्या व्यक्ती या सामान्य व्यक्तींच्या तुलनेत अधिक कल्पक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. चीनमधील पेर्किंग विद्यापीठाने चहा पिण्याच्या सवयींवर नुकतचं संशोधन केले. त्यात चहा पिणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक कल्पक असल्याचे निदर्शनास आले.

चहामध्ये कॅफीनबरोबरच इतर घटक असतात. ज्यांच्या सेवनामुळे झोप उडतेच शिवाय मूडही फ्रेश होतो. म्हणूनच चहा प्यायल्यावर अनेकजणांना कामात हुरुप येतो. यावर चीनमधील पेर्किंग विद्यापीठातील मनोविकारतज्ज्ञांच्या टीमने 50 विदयार्थ्यांवर अध्ययन केले. हे सर्व तरुण 23 वर्ष वयोगटातील होते. यातील अर्ध्या विदर्यार्थ्यांना पिण्यास पाणी देण्यात आले. तर इतरांना ब्लॅक टी. त्यानंतर विदर्यार्थ्यांना एका विषयावर त्यांची मत व्यक्त करण्यास सांगितले. त्यावेळी चहा पिणाऱ्या विदर्यार्थ्यांनी मतातून व्यक्त केलेली कल्पकता बघून संशोधकही थक्क झाले.