
सामना ऑनलाईन। बीजिंग
चीनमधील दूरसंचार सेवा पुरवणाऱया चायना युनिकॉमने झिगुआंग कंपनीसोबत भागीदारी करत 5 जी सिमकार्ड लाँच केले आहे. जगातील हे पहिले 5 जी सीमकार्ड आहे.
सध्या 4G LTE सीम कार्डचा वापर सर्वाधिक केला जातो. 128/256 KB इतकीच या सीम कार्डची स्टोरेज क्षमता आहे. यामध्येही SMS आणि कॉन्टॅक्ट सेव्ह होतात. 5 जी कनेक्टिक्हीटी असणाऱया फोनमध्येच या सीमकार्डचा वापर करता येणार आहे. चायना युनिकॉम कंपनी 5जी नेटकर्क ऑक्टोबर 2019मध्ये लाँच करणार आहे. हे पहिलं 5जी सीम कार्ड 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबीच्या पर्यायासह उपलब्ध होणार आहे. आगामी काळात या सीम कार्डच्या स्टोरेजची क्षमता 512 जीबी आणि 1 टीबी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कंपन्या 5 जी स्मार्ट फोन
हिंदुस्थानात फाईव्ह जी नेटवर्क येण्यापूर्वीच आम्ही आमच्या कंपनीचा फाईव्ह जी स्मार्टफोन लॉंच करू, असे नुकतेच रियलमी कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले होते. हिंदुस्थानात 2020 पर्यंत फाईव्ह जी नेटवर्क येणार आहे. पुढील महिन्यांपासून मोबाईल ऑपरेटर कंपन्या फाईव्ह जीची ट्रायल घेणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
सॅमसंग, शाओमी, ओप्पोसारख्या बडय़ा कंपन्याही फाईव्ह जी स्मार्टफोन निर्मितीवर काम करत आहेत.



























































