बिकानेर एक्सप्रेस घसरली, सहा ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये बीकानेर- गुवाहाटी एक्सप्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. ही एक्सप्रेस पटनाहून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना मैनगुडी येथे ही घटना घडली. यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफसह स्थानिक बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झाले होते, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अचानक झटका बसला आणि डबे उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त या अपघाताची चौकशी करणार आहेत.