
अल्पवयीन मुलांची टोळी बनवून एकापाठोपाठ एक अशा आठ दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हर्षद सुपे असे अटक समावेश आहे. हर्षद असे अटक त्याच्याकडून आठ दुचाक्या जप्त केल्या. अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. अशातच क्राइम ब्रँचला माहिती मिळाली की, अमरडाय कंपनीजवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर 6,7 जण चोरीच्या दुचाक्या घेऊन फिरत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, मंगेश जाधव, अमर कदम, रितेश वंजारी, संजय शेरमाले, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, अविनाश पवार यांनी सापळा रचून 7 जणांना ताब्यात घेतले.
























































