
राज्याच्या अनेक भागात अजूनही कोंबड्या, बदके, पोपट मृतावस्थेत आढळून येत असून आतापर्यंत 19 हजार 525 पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एक मोर आणि नांदेड जिल्ह्यातील हंगरगा गावात घुबडाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. यवतमाळमध्ये मृतावस्थेत आढळलेला मोर आणि नांदेडमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या घुबडाचे नमुने भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेत व पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मोर व घुबडाला बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेशातील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागातही कोंबड्या, बदके व इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागातील पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.































































