शहापुरात भाजपला खिंडार; शिवसेनेत इनकमिंग जोरात, भाजप, अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भगवा

काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील चेरपोली येथील शकडो तरुणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. यापाठोपाठ आता खातिवली, वेहळोली व दहागाव येथे भाजपला खिंडार पडले आहे. भाजप, अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी खांद्यावर भगवा घेतला आहे.

भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य चेतन जाधव, वेहळोलीचे विद्यमान सरपंच व सदस्य, खातिवलीचे ग्रामपंचायत सदस्य, बुथप्रमुख, दहागाव येथील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शहापुरात भाजप आणि अजित पवार गटाला खिंडार पडले आहे. खातिवली येथील मेळाव्यात शिवसेनेचे उपनेते विश्वास थळे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, जिल्हाप्रमुख केदार दिघे, भिवंडी तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख बाळा धानके, दत्ता ठाकरे, विलास पाटील, चिंतामण जाधव, रश्मी निमसे, गुलाब भेरे, मिलिंद देशमुख, गणेश अवसरे, रवींद्र लकडे, विलास काबाडी, सचिन महाजन, चेतन काबाडी उपस्थित होते.

जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा
तालुक्यात अजूनही काही प्रवेश सोहळे लवकरच होणार आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला