भाजपची टीव्हीवर ‘चमकोगिरी’, आघाडीच्या कंपन्यानाही टाकले मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भारतीय जनता पार्टीने पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसाभा निवडणुकीच्या प्रचारासाठी टीव्हीवर अक्षरश: जाहिरातींचा पाऊस पाडला आहे. टीव्हीवर जाहिराती देण्यामध्ये भाजपने मोठ मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बार्क) ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराचा धुराळा उडाला झाला आहे. त्यामुळे राजकिय पक्षांनी टीव्ही आणि प्रसारमाध्यांवर जाहिराती देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र भाजपने टिव्हीवर जाहिराती देण्यात आघाडीच्या कंपन्यांना देखील मागे टाकले आहे. टीव्हीवर जाहिराती देण्यामध्ये सध्या हिंदुस्तान यूनिलीवर, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, विमल पान मसाला आणि ट्रिवागो यासारख्या कंपन्यांना भाजपने मागे टाकले आहे. सर्व चॅनेल्सवर जाहिराती देण्यामध्ये भाजपा नंबर एकवर आहे. तर मागील आठवड्यात भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. तर काँग्रेस पक्षाचा समावेश पहिल्या दहामध्ये देखील नव्हता.

सध्या विभानसभा निवडणुका असून स्थानीक मुद्यांवर प्रचार सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकिय पक्षांची जाहिरातबाजी आणखी वाढणार असल्याची शक्यता जाहिरात कंपन्यांकडून व्यक्त होत आहे.