इनकमिंग, मेगाभरतीमुळे भाजप ‘कल्चर’ विचलित झाले,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant-patil

गेल्या काही वर्षांत देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलले तसे भाजपमध्ये इनकमिंग वाढली. मेगाभरती सुरू झाली आणि भाजपचे कल्चर थोडेसे विचलित झाले, अशी थेट कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी आकुर्डी येथे दिली. भाजपमध्ये जवळच्या लोकांना तिकिटे देण्याची पद्धत रूढ झाली आणि पक्षवाढीसाठी कित्येक वर्षे संघर्ष केलेले बाजूला पडले असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आकुर्डीतील हॉटेलात पार पडली त्यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. येथे दर तीन वर्षांनी बूथपातळीपासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंत निवडणुका होत असतात. भाजपमध्ये गुणवत्ता, काम आणि निष्ठा पाहिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलले तसे भाजपमध्ये इनकमिंग काढली. मेगाभरती सुरू झाली आणि भाजपचे कल्चर थोडेसे विचलित झाले. पक्षवाढीसाठी कित्येक वर्षे संघर्ष केलेले बाजूला राहून ‘दिल के नजदीक’ अशी समीकरणे चालू झाली. परंतु अशा समीकरणांना सुरुंग लावला पाहीजे.