नागपुरमध्ये भाकरी फिरवली; फडणवीसांचे धक्कातंत्र; भाजपने अनेक दिग्गजांना घरी बसवले

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने नव्या चेहऱयांना उमेदवार म्हणून संधी देत सत्तेची भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत यंदा भाजपच्या अनेक दिग्गजांना घरी बसवले. यामध्ये फडणीस, नितीन गडकरी यांच्या कट्टर समर्थकांचा समावेश आहे. तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्यांना घरी बसवल्याने नागपूर भाजपात खळबळ उडाली आहे.

नागपूर महापालिकेत मागील निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. सत्ता आल्यानंतर सुमारे 80 टक्के नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांच्या तिकीट कापण्याचा इशारा भाजपने दिला होता तो खरा ठरला आहे. भाजपने बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मात्र ज्यांना तिकिटे द्यायचे होते त्यांना पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बोलवून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उद्या सर्वच उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत. कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

म्हणून उमेदवारी कापली

भाजपने उमेदवारी देण्यापूर्वी इच्छुक तसेच संभाव्य उमेदवाराचा सर्व्हे केला होता. याशिवाय महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही नगरसेवकांना आपले कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांना नागरिकाच्या संपका&त राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही अनेकांनी कार्यालय सुरू केले नाहीत. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत अशा सर्वांची तिकिटे कापण्यात आल्याचा दावा भाजपतर्फे केला जात आहे.

आयारामांना भाजपमधून विरोध

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने विविध पक्षांतील पदाधिकाऱयांना पक्षात प्रवेश दिला होता. इतर पक्षांतून आलेल्या आयारामांना भाजपातूनच विरोध होत असल्याने अद्याप 35 जागांवर भाजपात उमेदवारांच्या नावावरून एकमत झालेले नाही. रात्री उशिरा नितीन गडकरी यांच्या घरी परत एकदा भाजपचे आमदार आणि कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे समजते.

नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश भोयर, स्थायी समितीचे माजी सभापती व सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ सदस्य चेतना टांक, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, माजी नगरसेवक हरीश दिकाsंडवार या मातब्बर माजी नगरसेवकांना भाजपने धक्का दिला आहे.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा, बाल्या बोरकर, बंटी कुकडे, माजी महापौर मायाताई इवनाते, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांना मात्र आपले तिकीट राखण्यात यश आले आहे.