Chandrapur News – चंद्रपूर महापालिकेत भाजपमध्ये बंड, स्वतःच्या महापौरांविरोधात नगरसेवकांचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्येच अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सभागृह नेतेपदाच्या नियुक्तीवरून हा वाद चिघळला असून, तब्बल 27 नगरसेवकांनी एकमुखाने शेखर शेट्टी यांची सभागृह नेते म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी महापौरांकडे लेखी निवेदनही सादर केले होते. मात्र या मागणीला डावलून महापौरांनी स्वतःच्या मर्जीने दुसऱ्याच नगरसेवकाची सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याचा आरोप नाराज नगरसेवकांनी केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत नगरसेवक महापौरांची भेट घेण्यासाठी थांबून होते. मात्र महापौर कार्यालयात न आल्याने त्यांचा रोष अधिकच वाढला. महापौरांकडून घेतलेल्या निर्णयावर नगरसेवकांनी बेमानीचे राजकारण केल्याचा आरोप करत जाहीर निषेध नोंदवला असून, या प्रकरणामुळे महापालिकेतील सत्तासंघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.