
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाने भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुलकितव्यतिरिक्त त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनाही शिक्षा सुनावली. तसेच तिन्ही दोषींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 18 सप्टेंबर 2022 च्या रात्री ऋषिकेश येथील वनांत्रा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी नावाच्या रिसेप्शनिस्टची तीन जणांनी हत्या केली होती.