
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला डाव्या विद्यार्थी संघटनांनी धोबीपछाड दिला. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या आघाडीने विद्यार्थी संघाच्या चारही जागा जिंकल्या. ‘अभाविप’ला भोपळादेखील फोडता आला नाही.
अध्यक्षपदासाठी अदिती मिश्रा हिने अभाविपच्या विकास पटेल याचा तब्बल 449 मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी किझाकूट गोपिका बाबू, सुनील यादव सरचिटणीस, तर दानिश अली सहसचिव पदी निवडून आले.



























































