भाजपचे फुके म्हणाले शिंदे गटाचा बाप मीच! फडणवीसांची सारवासारव

भंडारा जिल्हा दूध संघ व मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून भाजप आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच भाजप आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान शिंदे गटाचा बाप मीच आहे, असे वक्तव्य केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुके यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, अशी सारवासारव केली.

शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत आमदार फुके यांच्या वक्तव्याचा निषेध करत सैराट सुटलेल्या वळूला भाजप पक्षश्रेष्ठींनी आवर घालावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण वक्तव्याचा अर्थ नीट पाहिला तर शिंदे गटाचा बाप मीच आहे असं त्यांनी पुठेही म्हटलेलं नाही, असे सांगत या वादावर पडदा टाकला.