शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

माजी राज्यमंत्री, राहुरी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. बुऱ्हाण नगर गावचे सरपंच ते आमदार, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. राज्यातील अग्रेसर असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून ते सध्या काम पाहत होते.