शिंदे गटाच्या पॅम्प्लेटवर भाजप आमदाराचा फोटो

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या पॅम्प्लेटवर भाजप आमदाराचा फोटो दिसल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो विरोधी पॅनलच्या पॅम्प्लेटवर आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. प्रभाग 7 मधील राष्ट्रवादी आणि शिंदे गट उमेदवारांच्या प्रचारातील पॅम्प्लेटवर आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो दिसला. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून 102 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत.