सोलापुरातील भाजप पदाधिकारी शिवसेनेत

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला खिंडार पडले आहे. भाजप किसान मोर्चाच्या सरचिटणीसांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची घुसमट सुरू आहे. सोलापूर भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सरचिटणीस गजानन हलसंगी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी शिवबंधन बांधून गजानन हलसंगी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. सोलापुरात भारतीय जनता पक्षामध्ये भाजपातील मुळचे कार्यकर्ते हे तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. येत्या काही दिवसांत भाजपातील अनेक पदाधिकाऱयांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे.