भाजपने महाराष्ट्रातील चार बंडखोर नेत्यांना केले निलंबीत

8230
bjp-logo

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्या चार नेत्यांना भाजपने निलंबीत केले आहे. चरण वाघमारे (तुमसूर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हळ (पिपंरी चिंचवड), दिलीप देशमुख (सुमेरपुर) अशी निलंबीत नेत्यांची नावे आहेत.

भाजप नेत्या व मीरा भाईंदरच्या माजी महापौर यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता य़ांच्याविरोधात निवडणूक अर्ज दाखल केला आहे. तर तुमसुरमधून भाजपच्या प्रदीप पडोळ यांच्याविरोधात चरण वाघमारे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर बाळासाहेब ओव्हळ यांनी पिपंरी चिंचवडमधून बंडखोरी करत शिवसेनेच्या गौतम चाबूकस्वार यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. तर सुमेरपूरमधून दिलीप देशमुख यांनी बंडखोरी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या