भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्यालाच कोंडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये बाणकुरा येथील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांना मंगळवारी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात कोंडून याचा प्रत्यय दिला. जिल्हास्तरावरील पक्षीय कामकाजात एखाद्या हुकूमशहासारखे सरकार वागतात, असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना मान न देता सरकार त्यांच्या पिट्टय़ांना जिल्हा समित्यांवर नियुक्त करत आहेत, असे मोहित शर्मा या कार्यकर्त्याने सांगितले.