भाजपशासित राज्यांतही आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, अलाहाबाद, कन्नोज, कानपूरसह अनेक ठिकाणी समाजवादी पक्षाने आंदोलन केले. काही ठिकाणी महामार्ग अडविला. रेल्वे रूळावर चक्का जाम केले. विशेषतः पश्चिमी उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले.

  • बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महामार्ग रोखले तसेच रेल्वे रोको आंदोलन केले.
  • मध्य प्रदेशातही शेतकऱयांनी भोपाळसह अनेक ठिकाणी आंदोलन केले.
  • गुजरातमध्ये बंद पाळला जाणार नाही, अशी धमकी देणाऱया मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या राज्यातही शेतकऱयांनी आंदोलन केले.