विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी आणि डावपेचांचे नियोजन करण्यासाठी बैठका आणि भेटीघाठींचे सत्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. मात्र यामुळे भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. सांगलीतील जत तालुक्यात भाजपच्या बैठकीत उमेदवारीवरुन दोन गटात राडा झाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषगांने भाजपने सांगतीलीत जत तालुक्यात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरुन दोन गटात राडा झाला. भाजपच्या तमनगौडा रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भुमिपुत्रालाच संधी द्यावी अशी आग्रही मागणी केली. मात्र या मागणीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात आले मात्र कोणीही शांत राहण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठांनी मध्यस्थी केली आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
जत विधानसेभासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर इच्छूक आहेत. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातवरण आहेत. कारण जतमधून तमनगौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे सुद्धा इच्छूक आहे. भाजपने अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. असे असले तरी, पडळकर आणि रवी पाटिल गटांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे.